विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी:वणी -मारेगाव रोडवरील सोमनाळा फाट्याजवळ दिं. ११ डिसेंबर ला सायंकाळी ६ ते ६.३० वाजता ट्रक व मोटारसायकल चा भीषण अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला तर दुसरा जखमी.
प्रविण तुळशीराम येरमे वय वर्ष ४५ रां. पिसगाव (पांढरकवडा) ता. मारेगाव असे मृतकाचे नाव आहे.
प्रविण व रवी हे सख्खे चुलत भाऊ काही कामा निमित्त वणी येथे आले होते. कामे आटपून सायंकाळी ते मोटारसायकल ने आपल्या गावी परत जात असताना सोमनाळा फाट्याजवळ ट्रक(टिपर) वाहनाने त्यांच्या मोटारसायकल ला धडक दिली त्यात पिसगाव येथील ग्रामपंचायत सदस्य प्रविण येरमे याचा जागीच मृत्यू झाला तर मोटारसायकल वर मागे बसलेला रवी येरमे हा जखमी झाला.
या दुर्दैवी घटनेने पिसगाव मध्ये शोककळा पसरली आहे.
