ठळक बातम्या

    ब्रम्हपुरी : श्रीसंत गाडगेबाबा जयंती महोत्सवात सामूहिक विवाह सोहळ्याचे नियोजन

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    ब्रम्हपुरी : श्रीसंत गाडगेबाबा यांची १४९ वी जयंती महोत्सवापासून सुरू झालेली सामाजिक उपक्रमांची परंपरा अधिक भव्यतेने पुढे नेण्यात येणार असून, येणाऱ्या १५० व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी धोबी–वरठी समाजाच्या मुला–मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्त्वपूर्ण सत्कार्य आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

    समाजातील वधू–वरांना कमी खर्चात, समाजाच्या उपस्थितीत आणि पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात बांधून समाज ऐक्य आणि सामूहिक प्रगतीचा संदेश देण्याचा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

    या सोहळ्याच्या नियोजनासाठी श्रीसंत गाडगेबाबा धोबी/वरठी समाज सेवा मंडळ, ब्रम्हपुरी पुढाकार घेत आहे. या उपक्रमासंबंधी अधिक माहिती, नोंदणी व मार्गदर्शनासाठी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा:

     श्री प्रशांत मेश्राम

     श्री लालाजी पेंदोरकर

     श्री प्रमोद मेश्राम

     श्री सुनील शिरपूरकर

     श्री माणिक केळझरकर

     श्री मंगेश मेश्राम

     श्री सुरज टेम्भूरकर

     श्री विशाल चिकनकर

    श्री रवींद्र केळझरकर

     श्री सचिन लोणारकर

      श्री रवीभाऊ मेश्राम

      संपर्क-  8421112888

      संपर्क-  9637591294

    हा सामूहिक विवाह सोहळा समाजाला एकत्र आणत सामाजिक बांधिलकी मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, 
    असा विश्वास समाजातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.





    Photo