विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : मराठी विज्ञान परिषदेचे वतीने येथे गणित व विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक व विशेष अतिथी म्हणून प्रा.श्री. महादेवराव खाडे सर माजी प्राध्यापक लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी यांनी विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने गणित व विज्ञानातील कठीण संबोध अगदी हसतखेळत सादर करून दाखविले, विज्ञानाचे प्रयोग सुद्धा सादर केले, यावेळी विद्यार्थ्यांनी भरभरून उत्स्फूर्त
प्रतिसाद देऊन उत्तरे दिली व बक्षिसे सुद्धा प्राप्त केली. माजी केंद्रप्रमुख श्री. लक्ष्मणराव इद्दे सर यांनी सुद्धा गणित व विज्ञानावर मार्गदर्शन केले .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ पद. शि. श्री. राजेश खुसपूरे सर, प्रमुख अतिथी म्हणून .श्री. किशोर कोट्टी सर पद. शि, श्री. जनार्धन हालगरे सर पद . शि., कु.सोनाली टोंगे मॅडम, श्री. अमर मडावी सर, कु. श्रृतिका फटाले मॅडम हे उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक श्री. राजेश खुसपूरे सर यांनी केले.
संचालन व आभार प्रदर्शन श्री. अमर मडावी सर यांनी केले.





