ठळक बातम्या

    वणी : पत्रकार रवि ढूमणे यांची आत्महत्या; परिसरात खळबळ

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी परिसरात सुपरिचित असलेले पत्रकार रवि ढूमणे यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार, दिनांक १५ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे वणी शहरासह पत्रकार वर्तुळात शोककळा पसरली आहे.

    रवि ढूमणे हे मूळचे वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील रहिवासी होते. सध्या ते नांदेपेरा बायपास रोडवरील विद्या नगरी परिसरात कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. अभ्यासू, निर्भीड आणि धाडसी पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. सामाजिक प्रश्नांवर परखड लेखन व बातम्यांमुळे ते सर्वत्र परिचित होते.

    ढूमणे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

    रवि ढूमणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व सून असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    " विदर्भ वार्ता|पत्र " कडून भावपूर्ण श्रध्दांजली

    Photo