ठळक बातम्या

    वणी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन ट्रामा केअर सेंटर सुरू करा शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी .

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी ग्रामीण रुग्णालयाची अवस्था सध्या दयनीय अवस्था आहे. परिणामी वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या म्हत्वाच्या विषयाला धरून शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांनी वणी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा आणि ट्रामा केयर सेंटर सुरू करण्याची मागणी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय राठोड यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

    निवेदनात म्हटले आहे की, वणी हा खनिज संपत्तीने समृद्ध असा तालुका असून याला लागून मारेगाव व झरी जामणी हे तालुके येतात. या दोन्ही तालुक्यातील नागरिकांचे प्रमुख व्यवहार बाजारपेठ, कार्यालयीन कामकाज व दैनंदिन सेवा हे सर्व वणी शहरावर अवलंबून आहेत.

    वणी-मारेगाव-झरी या तिन्ही तालुक्यांचा एकत्रित लोकसंख्या आकडा जवळपास पाच लाखांवर पोहोचतो; परंतु या विस्तीर्ण परिसरात सक्षम, सुसज्ज व अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा अत्यंत अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. येथून जिल्हा मुख्यालय यवतमाळ सुमारे १०५ किमी अंतरावर आहे, तर झरी-जामणी तालुक्यातील नागरिकांसाठी ते १५० किमीपेक्षा अधिक आहे. या भौगोलिक मर्यादेचा व असुविधेचा फायदा घेत अनेक खाजगी रुग्णालये नागरिकांकडून अवाजवी शुल्क आकारत असून सर्वसामान्य लोक आर्थिक शोषणाला बळी पडत आहेत.

    वणी, झरी आणि मारेगाव या तालुक्यांमध्ये कोळसा, डोलोमाइट, लाइमस्टोन, बेडरॉक, ब्लेंकरोंक आदी खनिजांचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असते. सततचे धूळप्रदूषण, धूर व औद्योगिक क्रिया कला पांमुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत श्वसनविकार, दम्याचे त्रास आदी आजारांचे प्रमाण अत्यंत वाढले आहे. ही परिस्थिति अनेक वर्षांपासून लोक सहन करत आहेत.

    दिनांक २६ रोजी माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री ना. श्री एकनाथ शिंदे यांच्या वणी भेटीदरम्यान या प्रश्नांवर आशेचा किरण मिळाला. ग्रामीण रुग्णालय, वणी यांनी आतापर्यंत नवीन इमारत, वाढीव बेड क्षमता, आधुनिक सुविधा, अत्याधुनिक उपकरणे व पुरेसा वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी करत शासनाकडे अनेक प्रस्ताव सादर केले आहेत; मात्र आजपर्यंत यावर समाधानकारक कार्यवाही झालेली नाही.

    विशेष म्हणजे वणी हा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अत्यंत दुरावलेला भाग असल्यामुळे वाहतूक सुविधांची कमतरता, रुग्णवाहिकांची अपुरी उपलब्धता व तातडीच्या सेवांचा अभाव यामुळे अनेक रुग्णांची जीवितहानी होते, ही अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक बाब आहे. त्यामुळे वणी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा,

      ट्रामा केअर सेंटर तातडीने सुरू करण्यास मान्यता देण्यात यावी. अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांनी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

    Photo