विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
ब्रम्हपुरी : देलनवाडी वॉर्ड येथील गाडगे महाराज स्मारक येथे दिं. २० डिसेंबर ला संत गाडगे महाराज यांची ६९ वी पुण्यतिथी अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रवीभाऊ मेश्राम हे होते. यावेळी श्री मंगेश मेश्राम (सचिव), श्री प्रशांत मेश्राम (कोषाध्यक्ष), लालाजी पेंदोरकर (सहसचिव), प्रमोद वा. मेश्राम (कार्याध्यक्ष), संजय मेश्राम (सल्लागार), चंद्रकांत ताडपल्लीवर (मार्गदर्शक) यांच्यासह अरविंद मेश्राम, माणिक केळझारकर, दिवाकर मेश्राम, सुनील शिरपूरकर, ध्ञानेश्वर मेश्राम, महेश बारसागडे, अंकुश मेश्राम (युवा अध्यक्ष), योगेश बारसागडे, राजेंद्र शेंडे, रवींद्र केळझारकर, सचिन लोणारकर, किशोर लाडे, विशाल चिकनकर, सतीश मेश्राम आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत गाडगे महाराजांच्या सामाजिक कार्याचा व स्वच्छता, शिक्षण व समाजप्रबोधनाचा संदेश यावर विचार व्यक्त केले.पुण्यतिथीनिमित्त श्रीसंत गाडगेबाबा लॉंड्री पुरुष बचत गट, ब्रम्हपुरी यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी श्रीसंत गाडगेबाबा धोबी/व समाज सेवा मंडळ, ब्रम्हपुरी यांना स्वर्ग अंत्ययात्रेसाठी उपयोगी शिडी सप्रेम भेट देण्यात आली.
या उपक्रमामुळे समाजोपयोगी कार्यास हातभार लागला असून गाडगेबाबांच्या विचारांनुसार स्वच्छता, सेवा व सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
समाजातील प्रत्येकाने संत गाडगे महाराजांच्या विचारांचा अंगीकार करून समाजसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रम शांततेत व भक्तीमय वातावरणात पार पडला.



