ठळक बातम्या

    ज्येष्ठ नागरिक संघातर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     वणी : गणेशपूर रोडवरील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष अरुणराव कावडकर होते.

    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुंडलिकराव बुच्चे सर, विठ्ठलराव तुराणकर तसेच मंडळाचे सचिव अशोकराव सोनटक्के उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधींचे सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचे विचार तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा व देशसेवेच्या कार्यावर मार्गदर्शन केले.

    याप्रसंगी विठ्ठलराव तुराणकर यांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाचे संचालन परसावार सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शर्मा सर यांनी केले. कार्यक्रमाला अनिलराव कांबळे, भोंगळे साहेब, पिंपळकर साहेब, गटलेवार सर, चुम्बळे सर, सौ. चुम्बळे मॅडम यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायगावकर, बापुजी वाढई यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

    Photo