ठळक बातम्या

    सहकार महर्षी अ‍ॅड. देविदासजी काळे यांच्या अमृत महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ; मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

     सहकार महर्षी अ‍ॅड. देविदासजी काळे यांच्या अमृत महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ; अभिष्टचिंतन सोहळ्यात शुभेच्छांचा वर्षाव

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : सहकार क्षेत्रासह सामाजिक व सार्वजनिक जीवनात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे सहकार महर्षी अ‍ॅड. देविदासजी काळे यांच्या अमृत महोत्सवाचा प्रारंभ सोहळा सोमवारी, १९ ऑक्टोबर रोजी वणी येथील वसंत जिनिंग हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यात मित्रपरिवार, हितचिंतक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत अ‍ॅड. काळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

    अ‍ॅड. देविदासजी काळे यांच्या अमृत महोत्सवी वाटचालीचा प्रारंभ हा त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक, सहकार व सार्वजनिक कार्याचा गौरव करणारा क्षण ठरला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत, समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि जपलेली सामाजिक बांधिलकी यापुढेही अशीच सुरू राहावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.


    या सोहळ्यास आमदार संजय देरकर, वामनराव कासावार, डॉ. भालचंद्र चोपणे, मनसे नेते राजू उंबरकर, विजय बाबू चोरडिया,संजय खाडे, वसंत जिनिंगचे अध्यक्ष प्रमोद वासेकर, सुनील कातकडे, सौ. किरण देरकर, उत्तमराव गेडाम, चिखलगावच्या सरपंच सौ. रुपाली कातकडे, इजहार शेख, ओम ठाकूर, जय आबडा, विवेक मांडवकर, सुरेशराव बर्डे, अ‍ॅड. घनश्याम निखाडे, परीक्षेत एकरे, चिंतामण
    आगलावे, सुनील देठे, लिंगरेड्डी अंडेलवार, हरीशंकर पांडे, पुरुषोत्तम बदमवार, निमाताई जीवने, छायाताई ठाकूरवार, शंकरराव वराटे, सुनील वरारकर यांच्यासह मित्रपरिवार व हितचिंतक उपस्थित होते.

    यावेळी उपस्थितांनी अ‍ॅड. देविदासजी काळे यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, त्यांच्या आयुष्यातील पुढील वाटचाल आनंददायी व यशस्वी ठरावी तसेच त्यांच्या हातून यापुढेही समाजोपयोगी कार्य घडत राहावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

    या अमृत महोत्सवाच्या प्रारंभ सोहळ्याच्या आयोजनासाठी अ‍ॅड. देविदास काळे यांच्या मित्रपरिवाराने विशेष पुढाकार घेतला. उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

    अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने वणी परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.



    विदर्भ वार्ता पोर्टल न्यूज वणी परिवार कडून सहकार महर्षी 

    ॲड ,श्नी,देवीदासजी काळे यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा.





    Photo