ठळक बातम्या

    वाढदिवसाचा थाट नाही, दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात! पवण एकरे यांचा ₹११ हजारांचा स्तुत्य उपक्रम

     बॅनरबाजी व अनाठायी खर्चाला फाटा; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तहसीलदारांकडे मदतीचा धनादेश सुपूर्द



    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : वाढदिवस म्हटला की मोठमोठे बॅनर, जाहिराती आणि अनाठायी खर्च करण्याची पद्धत वाढत असताना भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ जिल्हा ओबीसी अध्यक्ष मा. पवण राम एकरे यांनी याला फाटा देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ हजार रुपयांचा धनादेश दिला.

    दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी वणी येथे तहसीलदार यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी विनायक ढवस, नेताजी भोयर,अनंता बोढे,शामभाऊ तराळे,अक्षय लोढे,नागेश धनकसार ,बाळू भाऊ खामणकार, राहुल आत्राम,प्रेम ढवळे,संजय चिंचोलकर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या भूमिकेतून कार्य करणारे पवण एकरे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या या उपक्रमातून सामाजिक जाणीव जपली आहे. वाढदिवसावर होणारा खर्च गरजूंसाठी आणि संकटग्रस्त शेतकरी-कुटुंबांसाठी उपयोगी पडावा, या भावनेतून त्यांनी ही मदत केली.

    सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अडचणीत असताना राजकीय पदाचा किंवा वाढदिवसाचा गाजावाजा करण्याऐवजी मदतीचा हात पुढे करणारा हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.

    वाढदिवसाचा उत्सव एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता, त्यातून समाजासाठी काहीतरी देण्याची भूमिका पवण एकरे यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली आहे.

    Photo