ठळक बातम्या

    धोबी-परीट समाजाच्या आरक्षणासाठी ‘चलो नागपूर’चा एल्गार; १८ ऑक्टोबरला नियोजन दौरा

     २७ ऑक्टोबरपासून संविधान चौक, नागपूर येथे उपोषण व साखळी उपोषणाचे आयोजन; पदाधिकारी व समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    नागपूर : महाराष्ट्र धोबी-परीट समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र धोबी-परीट समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने ‘चलो नागपूर’ आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी समितीचे अध्यक्ष डी. डी. सोनटक्के तसेच प्रभारी व सहप्रभारी यांच्या उपस्थितीत रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध ठिकाणी नियोजन दौरा आयोजित करण्यात आला आहे.

    महाराष्ट्र धोबी-परीट समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने २७ ऑक्टोबरपासून नागपूर येथील संविधान चौकात उपोषण व साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे नियोजनपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील पदाधिकारी व बांधवांमध्ये जनजागृती करून आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

    नियोजन दौऱ्यात ब्रह्मपुरी/वडसा येथे सकाळी १० वाजता, आरमोरी ११ वाजता, गडचिरोली दुपारी १२ वाजता, चामोर्शी दुपारी २ वाजता, चंद्रपूर दुपारी ३ वाजता, भद्रावती सायंकाळी ५ वाजता आणि वरोरा येथे सायंकाळी ६.३० वाजता बैठक व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

    समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी होणाऱ्या या आंदोलनात महाराष्ट्र धोबी-परीट समाज आरक्षण समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    “समाजाच्या हक्कासाठी एकजुटीने पुढे या—चलो नागपूर!” असा संदेश देत आंदोलन यशस्वी करण्यासाठी समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



    Photo