ठळक बातम्या

    वणी नगरपरिषद निवडणूक २०२५-२६ : प्रभाग १३ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराला वेग मतदारांची पहिली पसंती पायल तोडसाम व उमेदवारांना

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी नगरपरिषद निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेना शिंदे गटाने प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून विकासाच्या दिशेने… एक नवी वाटचाल या ध्येयवाक्याखाली जनसंपर्क मोहीम वेगात सुरू आहे.

    प्रभाग क्रमांक १३ मधून नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. किरण कुतरमारे व धर्मा काकडे तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कुमारी पायल तोडसाम यांनी आज प्रभागात दैदिप्यमान जनसंपर्क करत मतदारांशी संवाद साधला.

    या प्रचार मोहिमेला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक मा. विजय बाबू चोरडिया, मा. विनोद मोहीतकर, तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली. घराघरांत जाऊन घेतलेल्या प्रतिक्रिया दरम्यान मतदारांनी विकासाभिमुख नेतृत्वाबद्दल विश्वास व्यक्त करत शिंदे गटाच्या उमेदवारांना दाद दिली.मतदारांच्या प्रतिक्रिया पाहता प्रभाग १३ मध्ये शिवसेना शिंदे गटाची जोरदार लाट असून, उमेदवारांना मतदारांची पहिली पसंती मिळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

    Photo