विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : नगरपरिषद निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) तर्फे दिनांक २५ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक १ विद्या नगरी परिसरात भव्य कार्नर सभेचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ७ वाजता सुरू झालेल्या या सभेला परिसरातील नागरिकांनी उल्लेखनीय प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमात अध्यक्ष पदाच्या उमेदवार कु. पायल तोडसाम तसेच प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार
(अ) सौ. वसुधा ढगे
(ब) कैलास बोबडे
यांनी आपल्या भविष्यकालीन भूमिकेचा आढावा मांडत मतदारांशी थेट संवाद साधला.
कार्नर सभेचे नेतृत्व मान. विजय बाबू चोरडिया, मा. हरिहर लिंगनवार, मा. विनोद मोहीतकर, मा. मणिष सुरावर, मा. ठाकरे, मा. पेचे, मा. वैरागडे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केले.सभेत वक्त्यांनी वणीतील विकास विषयक मुद्द्यांना हात घालत उमेदवारांच्या कार्यक्षमतेवर प्रकाश टाकला. स्थानिक प्रश्न, प्रभागातील अपेक्षा आणि आगामी योजना यांवर झालेल्या चर्चेमुळे वातावरण माहितीपूर्ण आणि उत्साही बनले.
विद्या नगरी परिसरातील ही सभा नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे विशेष गाजली असून, निवडणूक रंगत आणखी वाढविणारी ठरल्याचे निरीक्षकांचे मत आहे.


