ठळक बातम्या

    वणी येथे मतदार जागृतीसाठी बाईक रॅली

     


    विदर्भ वार्ता |प्रतिनिधी

    वणी:आगामी 2 डिसेंबरला होणाऱ्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांना मतदानाविषयी जागृत करण्यासाठी वणी शहरातील 14 प्रभागातून वणी नगर परिषदेच्या  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली काढून जन जागृती केली. 

          या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले सुरुवात करून दिली. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, गट विकास अधिकारी किशोर गज्जलवार प्रामुख्याने उपस्थित होते. 

         
    येथील शासकीय मैदानावरून 150 मोटारसायकल सहित निघालेली रॅली प्रभाग क्रमांक 1 पासून निघून शहरातील सर्व प्रभागातून फिरत मतदान जागृतीच्या घोषण देत नागरिकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. 

         या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून या बाईक रॅली चा उद्देश मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे यांनी सांगितला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून प्रत्येक मतदाराने मतदान केले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांनी केले. या रॅलीचा समारोप पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावर झाला.

    Photo