विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी :राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या घोषणा, कार्यकर्त्यांचा तापलेला उत्साह आणि शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात भगव्याने नटलेले वातावरण… वणी शहरात २६ नोव्हेंबरला प्रचंड राजकीय वादळ धडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे “लाडक्या बहीणीचा लाडका भाऊ”हे स्वतः वणीकरांना संबोधित करण्यासाठी शासकीय मैदानात सकाळी ११ वाजता उपस्थित राहणार आहेत.शिवसेना शिंदे गटाच्या अध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराला वेग देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही भव्य जाहीर सभा वणीच्या राजकीय तापमानाला शिगेला नेणार, असा अंदाज आधीच वर्तवला जातोय.शहरात शिंदे गटाचे बॅनर, कटआउट, भगवे झेंडे आणि जय-जयकाराचा गजर वाढू लागला आहे. सभेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून रस्त्यांपासून मैदानापर्यंत प्रत्येक ठिकाणी वातावरण पूर्णपणे उत्साहाच्या भरात आहे.पक्षातील पदाधिकारींचे म्हणणे आहे की, “या सभेनंतर वणीतील चित्र बदलणार—निवडणुकीचा कल एकाच दिशेने झुकणार!” अशी स्पष्ट उमेदवारांची भूमिका समोर आली आहे.२६ नोव्हेंबरची सभा वणी नगरपरिषद निवडणुकीसाठी निर्णायक ठरणार, अशी चर्चा सध्या शहरभर होत असून, विपक्षातही यामुळे हालचाल सुरू झाली आहे.
