ठळक बातम्या

    वणी – नगरपरिषद निवडणूक २०२५-२६ प्रभाग क्रमांक १२ मध्ये शिवसेना (शिंदे गट) चा प्रचार वेगात; मतदारांचा वाढता विश्वास

    वणी वार्ता |प्रतिनिधी

    वणी :नगरपरिषद निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना प्रभाग क्रमांक १२ मध्ये शिवसेना (शिंदे गट) ने प्रचाराची गती लक्षणीयरीत्या वाढवली आहे. मा. विजय बाबू चोरडिया जिल्हा संघटक,विनोद मोहीतकर,शिंदे सेना पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष पदाच्या उमेदवार कुमारी पायल तोडसाम व नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. सोनाली अमृत पुरी व हरीओम प्रकाश गेडाम यांनी डोअर टु डोअर भेटींद्वारे मतदारांमध्ये जोरदार जनसंपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

    घराघरांत जाऊन केलेल्या संवादातून स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा, विकासाची दिशा आणि समस्यांचे निदान यावर उमेदवारांनी थेट चर्चा केली. यामुळे अनेक मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद आणि उत्स्फूर्त पाठींबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

    प्रचारादरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, नाली व्यवस्था, स्वच्छता, महिलांसाठी सुविधा, युवकांकरिता उपक्रम तसेच प्रभागातील मूलभूत सुविधांच्या उन्नतीबाबत आपल्या अपेक्षा उमेदवारांसमोर मांडल्या. यावर शिवसेना (शिंदे गट) च्या उमेदवारांनी विकासाभिमुख व पारदर्शक कामकाजाची ग्वाही दिली.

    प्रभाग क्रमांक १२ मध्ये होत असलेल्या या जोरदार जनसंपर्क मोहिमेमुळे शिवसेना शिंदे गटाने आघाडी घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असून, वाढता पाठींबा पाहता या प्रभागात लढत उत्कंठावर्धक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

    Photo