ठळक बातम्या

    प्रभाग २ मधून राजू तुराणकर यांची उमेदवारी जाहीर

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी नगरपरिषद निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मधून शिवसेना (उबाटा) गटाचे उमेदवार म्हणून माजी नगरसेवक व शिवसेना शहराध्यक्ष राहिलेले श्री. राजू भाऊ तुराणकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे.

    सामाजिक कार्यात सक्रिय आणि प्रभागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणाऱ्या तुराणकर यांनी यापूर्वी विविध पदांवर काम करताना अनेक स्थानिक प्रश्नांवर पुढाकार घेतल्याचे मानले जाते. त्यांच्या उमेदवारीनंतर प्रभागातील स्थानिक राजकारणाला नव्या चर्चांना उधाण आले आहे.

    शिवसेना (उबाटा) गटाकडून त्यांच्या बोधचिन्ह म्हणून " मशाल "चिन्हाची घोषणा करण्यात आली असून, आगामी निवडणूक प्रचारात या चिन्हाभोवती पक्षाची रणनीती अधिक गती घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

    प्रभागातील पायाभूत सुविधांचा विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा व स्थानिक प्रश्नांवर उपाययोजना या प्रमुख मुद्यांवर येणाऱ्या दिवसांत चर्चा रंगतील, अशी अपेक्षा आहे. वणी नगरपरिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे प्रभाग २ मधील राजकीय वातावरण अधिक उत्सुकता निर्माण करत असल्याचे चित्र आहे.



    Photo