विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : आज 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आंबेडकर चौक येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधान निर्मात्यांच्या स्मृतीला व कार्याला पत्रकार बांधवानी विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.कार्यक्रमात पत्रकार सुनील ठाकरे, सुशील अडकीने, अमोल कुमरे व नरेश ठाकरे यांनी सामूहिकरीत्या अभिवादन करून संविधान मूल्यांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांनी सामाजिक समता, बंधुता आणि लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले.संविधान दिनाच्या या औचित्याने आंबेडकर चौक परिसर देशभक्तीच्या आणि संविधानप्रेमाच्या भावनेने भरून गेला.
