वणी नगरपरिषद निवडणूक २०२५-२६ : विकासाची अभिलाषा… उज्वल भविष्याची दिशा .
विदर्भवार्ता | प्रतिनिधी
वणी :नगरपरिषद निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसेना (शिंदे गट) आपल्या विकासाभिमुख भूमिकेसह जोरदार तयारीत उतरला आहे. पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून (अ) सौ. प्रणीती हेमंत बांगडे व (ब)सौ,वर्षा अनिल सातपुते यांची घोषणा करण्यात आली असून नागरिकांच्या अपेक्षा, स्थानिक विकास आणि मजबूत नेतृत्वाची हमी देत दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे.
त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी कु. पायलताई तोडसाम या शिवसेना (शिंदे गट) यांच्या अधिकृत उमेदवार आहेत.
शहर विकासाच्या दृष्टीने दीर्घकालीन नियोजन, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची शाश्वत सोय, रस्ते-विना-अडथळा वाहतूक व्यवस्था, स्त्री-सुरक्षा आणि युवकांसाठी रोजगारनिर्मिती ही प्रमुख प्राधान्याची उद्दिष्टे असल्याचे या उमेदवारांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना (शिंदे गट) यांचे बोधचिन्ह “धनुष्यबाण” असून नागरिकांनी या चिन्हासमोरचे बटण दाबून उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“विकासाची अभिलाषा… उज्वल भविष्याची दिशा!” या घोषवाक्यासह प्रभाग क्रमांक ६ मध्ये निवडणूक वातावरणाला आता उभारणी मिळत आहे.

