ठळक बातम्या

    त्या आरोपीला कठोर शिक्षा करा मानवी हक्क सुरक्षा परिषद

    विदर्भवार्ता | प्रतिनिधी

    वणी: नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षाच्या निरागस चिमुकलीवर झालेल्या बलात्कार व निर्गुण हत्येच्या घटनेविरोधात संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे. विजय खैरनार नामक राक्षसी मनोवृत्तीच्या विकृत प्रवृत्तीने अमानवी कृत्य करून तिच्या तोडावर दगडाने ठेचून निघुण हत्या केली या घटनेमुळे समाजमन सुन्न होऊन भयभीत झाले आहे. अशा प्रवृत्तीच्या समाजातून कायमस्वरुपी नायनाट करण्यासाठी शासनाने जलदगती न्यायालयात खटला चालवून शीघ्रतेने कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे निवेदनातून करण्यात आली.

    यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख परशुराम पोटे, ज्ञानेश्वर बोनगिरवार, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे, वणी विधानसभा भाऊसाहेब आसुटकर, वणी शहर अध्यक्ष अजय चत्रे, यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत हनुमंते, सौ. सुमित्रा गोडे वणी तालुका महिला अध्यक्ष, सौ. सुनीता काळे वणी शहर महिला अध्यक्षा सौ. प्रमिला चौधरी व सुरेश बन्सोड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य, वामनराव कुचनकार प्रदेश कार्यकारी सदस्य. संदिप बेसरकर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य,राकेश दिकुंडवार, अमोल कुमरे, मारेगांव तालुका अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. मनिषा सु. निब्रड तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

    Photo