विदर्भ वार्ता | प्रतिनिधी
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या तोंडावरच अचानक प्रभागात सक्रिय होणारे, वर्षभर संपर्क नसणारे किंवा विकासकामांबाबत ठोस पुरावा न देता केवळ आश्वासनांचा वर्षाव करणारे काही उमेदवार यांच्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे.
मतदारांचा प्रश्न स्पष्ट आहे “निवडणुका आल्या की उमेदवार दिसतात; त्याआधी पाच वर्ष प्रभागाची दखल का घेतली जात नाही?”
काही नागरिकांनी तर विनोदी शैलीत टिप्पणी केली की, “प्रभागात काही नेते फक्त निवडणूक जवळ आली की अचानक येतात… म्हणूनच लोक म्हणू लागले ‘आला रे… आला लांडगा आला!’”
दरम्यान, अनेक प्रभागांमध्ये मतदार अधिक जागरूक होत असून उमेदवारांच्या कामगिरी, मागील कार्यकाळातील योगदान आणि उपलब्धतेचा आढावा घेत आहेत. निवडणुका जवळ येत असताना अशा चर्चा अधिक रंगत असून प्रभागातील राजकारणात वेगळीच चुरस निर्माण झाली आहे.
