यवतमाळ : यवतमाळच्या वतीने आयोजित ३६ वी अमरावती रेंज पोलिस विभागीय क्रीडा स्पर्धा आजपासून (१९ नोव्हेंबर) ते २३ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे. अमरावती शहर व ग्रामीण, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ अशा सहा जिल्ह्यांमधील सुमारे १२०० पोलीस खेळाडू या स्पर्धेत जोमाने सहभागी झाले आहेत.
१८ पेक्षा अधिक क्रीडा प्रकारांची मेजवानी
या पाच दिवसीय क्रीडा स्पर्धेत ७ संघीय खेळांसोबत विविध वैयक्तिक खेळांचे रोमांचक सामने पार पडणार आहेत.
संघीय खेळ:
कबड्डी, खोखो, हॉकी, व्हॉलिबॉल, फुटबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल
वैयक्तिक क्रीडा स्पर्धा:
बॉक्सिंग, स्विमिंग, कुस्ती, जूडो, वेटलिफ्टिंग, तायक्वांदो, पॉवरलिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग तसेच १०० मीटर, ८०० मीटर धावण्याच्या शर्यती आणि मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
स्पर्धेचे सुरळीत आयोजन करण्यासाठी निवड समित्यासह सुमारे २० वेगवेगळ्या समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील सहा ठिकाणी विविध सामने पार पडतील.
२३ नोव्हेंबरला बक्षीस वितरण समारंभ
या क्रीडा महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते सायं. ६ वाजता पालसवाडी येथील पोलिस परेड मैदानावर आयोजित आहे.
यावेळी विजेत्या खेळाडूंचा सत्कार विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती रेंज श्री. रामनाथ पोखळे यांच्या हस्ते होणार आहे.
समारोपासाठी स्वतंत्र मनोरंजन व समारोप समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.
