![]() |
वणी : समाजहितासाठी सातत्याने कार्य करत महिला सक्षमीकरण, जनजागृती व सामाजिक परिवर्तनासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल
मंगलाताई पद्माकर झिलपे यांना यंदाच्या जागतिक महिला दिनानिमित्त यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘विशेष कार्यगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या मंगलाताई पद्माकर झिलपे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत यवतमाळ जिल्हा पोलिसांनी त्यांचा विशेष सन्मान केला. समाजात महिला सक्षमीकरण, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी ठरले आहे.
महिलांना विविध क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देणे, समाजात सकारात्मक विचार रुजविणे तसेच सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे समाजात सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडण्यास मदत झाली असून अनेक महिलांना प्रेरणा मिळाली आहे.
त्यांच्या पोलीस विभागाला तात्काळ मद्दत करणे आणि पोलीस कार्यात मोलाचे सहकार्य करणे या सोबत सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग दर्शवीत असतात तसेच यवतमाळ जिल्हा शांतता समिती, वणी पोलीस स्टेशनं दक्षता समिती सदस्य आणि अध्यक्ष सुतार समाज महिला मंच अशा पदावर राहून कार्य करून उल्लेखनीय योगदानाची दखल घेत जागतिक महिला दिनानिमित्त यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘विशेष कार्यगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
हा सन्मान जागतिक महिला दिनाचे अवचित साधून यवतमाळ येथे प्रदान करण्यात आला असून यवतमाळचे पोलिस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.
या सन्मानाबद्दल विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मंगलाताई पद्माकर झिलपे
यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




