विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : सुतार समाज महिला मंच, वणी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी महादेव मंदिर, सुतारपुरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सुतार समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीच्या महिला अध्यक्षा वंदनाताई पुरुषोत्तम आवारी होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्य क्षेत्रीय अधिकारी (TDRF) कु. मुस्कान ज. सैय्यद उपस्थित होत्या.
यावेळी वैद्य सुवर्णा चरपे (श्री विश्व योग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र, वणी) यांनी “स्वयंप्रतिकारक रोगाशी लढताना” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान देऊन महिलांना आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान गट ग्रामपंचायत सदस्य माथोली व सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कु. प्रतीक्षा अरुण देऊळकर, नगरपरिषद वणीच्या नगरसेविका आरतीताई गिरीश वांढरे व अर्चनाताई शंकरराव झिलपे तसेच समाजातील होतकरू व कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.
दुपारी २ वाजता व्याख्यान व सत्कार समारंभाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत “मम्मी स्पेशल” नृत्य व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये समाजातील महिलांनी एकल नृत्य, सामूहिक नृत्य व नाटिका सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता लांडे यांनी केले.
सुतार समाज महिला मंच, वणीच्या अध्यक्षा मंगलाताई प. झिलपे, उपाध्यक्ष शारदाताई वि. झिलपे व संगीताताई वि. लांडे, सचिव जयश्रीताई धि. अंड्रस्कर, कोषाध्यक्ष संगीताताई न. मुरस्कर, कार्याध्यक्ष संगीताताई ह. झिलपे, सहसचिव पुष्पाताई सं. वनकर तसेच मंचाच्या
सदस्य, संध्या झिलपे, रत्नाताई अंड्रस्कर, शिवाणी बुरडकर, वेणुताई झोडे, आरतीताई वांढरे, अर्चना झिलपे, पुनमताई झिलपे, प्राचीताई नवघरे, मिनाताई झिलपे, श्रीमती शारदाताई झिलपे, संगिताताई राखुंडे, श्रीमती बेबीताई साखरकर,सोनिका साखरकर, प्रिया झिलपे, शुभांगी निवलकर, कोमल झिलपे, तेजस्वीनी राखुंडे, नाजुका राखंडे, मंगला झिलपे, सोनाली झिलपे, किरण बुरडकर, आचल वांढरे,कविता अंड्रस्कर, उषाताई झिलपे, दुर्गा झिलपे, खुशबु झिलपे, ज्योती झिलपे, कविता झिलपे, शालीनी झिलपे, वर्षा झिलपे,प्रतिभा मुरस्कर, प्रेमिला निवलकर सदस्यांसह समाजातील अनेक महिलांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.



