ठळक बातम्या

    धोबी समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व विजय दिगांबर भोंगळे यांचे निधन; आज मोक्षधाम वणी येथे अंत्यसंस्कार



    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी येथील धोबी समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व श्री. विजय दिगांबर भोंगळे (वय ६०) यांचे गुरवार दि. १२ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    स्व. विजय दिगांबर भोंगळे हे शांत, मनमिळावू स्वभावाचे असून समाजातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या जाण्याने धोबी समाजासह परिसरात शोककळा पसरली आहे.

    त्यांच्या पार्थिवावर दि. १२ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता मोक्षधाम, वणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

    धोबी समाजाच्या वतीने स्वर्गीय विजय दिगांबर भोंगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात समाज सहभागी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

                     भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏




    Photo