ठळक बातम्या

    मानकी बस स्टॉपवर गतिरोधक बसविण्याची मागणी

     

    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी तालुक्यातील मानकी येथील बस स्टॉप परिसरात वाहनांची मोठ्या वेगाने ये-जा होत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

    मानकी बस स्टॉपवर दररोज शालेय विद्यार्थी, नागरिक तसेच प्रवासी मोठ्या संख्येने ये-जा करतात. मात्र या ठिकाणी वाहनचालक वेगावर नियंत्रण न ठेवता वाहन चालवत असल्याने अनेकदा अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण होत आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी सदाशिव पोटे यांना रस्ता ओलांडताना एका भरधाव एसटी बसने धडक दिली होती या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता तर दुसऱ्या अपघात दोघांना ट्रक ने धडक दिली होती.

    यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मानकी बस स्टॉप परिसरात गतिरोधक बसवावे, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.



    Photo