विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणूकीत प्रभाग क्रमांक 14 (क)प्रलंबित राहिला होता. त्या एका जागेसाठी शनिवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवार सौ हिना अहेमद याच विजयी होणार असा दावा केला जात आहे. त्यांचे म्हणणे आहे की,
आमच्या मागे लोक असून माननीय विजय बाबू चोरडिया यांच्या नेतृत्वात आम्ही नक्कीच निवडून येऊ, असा विश्वास शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 14 (क) येथिल उमेदवार सौ हिना अहेमद यांनी व्यक्त केला.
त्या म्हणाल्या, आमच्या पाठीशी विजय बाबू चोरडिया यांच्या सारखे खंबीर नेतृत्व असल्याने जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. विजय आमचा निश्चित आहे. महिलांसाठी, सामान्य जनतेसाठी मी काम करणार आहे. सामान्यांचे प्रश्न मला माहीत असल्याने मी स्वतः ते अनुभवल्याने निश्चितच त्यातून मार्ग काढेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*20 डिसेंबर ला मतदान, 21 डिसेंबर ला मतमोजणी*
वणी नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली असून 14 प्रभागासाठी 2 डिसेंबर ला मतदान झाले. 3 डिसेंबर ला मतमोजणी होणार होती मात्र प्रभाग क्रमांक 14 मधिल 14 (क) ची एक जागा प्रलंबित राहिल्याने त्या एका जागेसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे तर सर्व 14 प्रभागासाठी 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

