विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी: क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त
माळी समाज संघटना वणी च्या वतीने प्रतिष्ठित 'माळी समाज भूषण पुरस्कार' साहित्यिक, संपादक आणि कलावंत डॉ. विनोदकुमार आदे यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या साहित्य आणि कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला असून, समाजाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
मंचावर आमदार संजयजी देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, काँगेस नेते संजय खाडे, नगराध्यक्षा विदयाताई आत्राम, माजी नगराध्यक्ष सुरेश रायपुरे, काँग्रेस नेते प्रमोद निकुरे, माजी सभापती संजय पिंपरशेंडे, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण निकुरे यांसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण, समाज प्रबोधन पार पडला.
डॉ. विनोदकुमार आदे यांना यापूर्वी नागपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्य छत्रिय कोसळे माळी समाज (विदर्भ) नागपूर संस्थेच्या वतीने त्यांना माळी समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. दुसऱ्यांदा त्यांच्या कर्मभूमीत (वणी) समाजातून पुरस्कार मिळाल्याने हा त्यांचा निस्वार्थ कार्य, कठोर परिश्रम आणि योगदानाची सामाजिक पोचपावती आहे.
त्यांच्या या यशाबद्दल समाजाबरोबरच डॉ. आदे यांचे कला, साहित्यिक वर्तुळातूनही कौतुक होत आहे.



