ठळक बातम्या

    २०० रक्तदात्यांनी दिले जीवनदान; अहीर ट्रस्टच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     चंद्रपूर : स्व. कालिदास अहीर तथा स्व. हितेंद्र अहीर यांच्या जयंती स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. गंगारामजी अहीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १४ ऑगस्ट  २०२६ ला चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल २०० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक व राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान दिले.

    गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेली रक्तदानाची परंपरा ही सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असून, ती समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. विशेषतः युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून गरजू रुग्णांचे जीवन वाचविण्याचा संकल्प पुढे नेल्याबद्दल आयोजकांनी समाधान व अभिमान व्यक्त केला.

    रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर जीवनदायी रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदानाची ही सामाजिक चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

    शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व रक्तदाते, वैद्यकीय अधिकारी, रक्तपेढीचे कर्मचारी, ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


                  “रक्तदान हेच जीवनदान!”








    Photo