विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी: सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम सकाळी महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संस्थेचे अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी ध्वजारोहन केले. त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी तथा वसतीगृहाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.त्यानंतर दुपारी १२ वाजता वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्य दिना निमीत्य भाषण व गायण स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धेत १८ विद्याथ्यर्थ्यांनी सहभाग घेतला. या मध्ये भाषण व गायण स्पर्धातीठ मुलंना प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक देण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष निकृबाजी सोनारखन, सचिव नवनाथ नगराळे, सहसचिव बाळासाहेब राजूरकर होते.
विद्यार्थ्यांच्या भाषनानंतर प्रमुख पाहुने वी नवनाथ नगराळे निकृष्णजी सोनारखन, बाळासाहेब राजूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.पुरुषोत्तम पाटील यांनी देशाला स्वातंत्र्य मोठ्या कष्टातून व प्रयत्नांतून मिळाले असून ते टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक मंगल तेलंग यांनी केले तर संचलन विद्यार्थी करण खुटेमाटे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास वडस्कर व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

