ठळक बातम्या

    देशभक्त नागरिकांच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी वणीत भव्य “तिरंगा रॅली”चे आयोजन

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी: नागरिकांमध्ये तसेच तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाचा संदेश जनमानसात पोहोचावा, या उद्देशाने वणी शहरातील समस्त देशभक्त नागरिकांच्या सहभागातून गुरुवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता “तिरंगा रॅली”चे आयोजन करण्यात आले आहे.

    या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर अथवा झेंडे न लावता, केवळ वणीकर नागरिक म्हणून आणि हातात तिरंगा घेऊन ही रॅली काढण्यात येणार आहे.

    या रॅलीमध्ये वणी शहरातील विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सदर रॅली ही पद रॅली असून, देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याप्रती असलेला अभिमान व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    रॅलीचा तपशील

    तारीख : गुरुवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२६

    वेळ : सकाळी ९.०० वाजता

    प्रारंभ : विश्रामगृह


    रॅलीचा मार्ग :

    विश्रामगृह → छत्रपती शिवाजी महाराज स्मारक → खाती चौक → महात्मा गांधी चौक → गाडगे बाबा चौक → काठेड ऑईल मिल चौक → सर्वोदय चौक → रविंद्रनाथ टागोर चौक → डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक → लोकमान्य टिळक चौक

    वणी तालुक्यातील सर्व नागरिकांनी, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, धार्मिक व सांस्कृतिक संघटनांनी तसेच युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन “तिरंगा रॅली” यशस्वी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


    आपले विनीत,

    समस्त देशभक्त नागरिक

    Photo