ठळक बातम्या

    “तिरंग्याच्या सन्मानासाठी तिरंगा दिमाखात फडकावा म्हणून मोफत इस्त्री सेवा” मानव लॉन्ड्रीचा देशभक्तीपूर्ण उपक्रम”

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    लाखांदूर: “देशभक्ती करण्यासाठी प्रत्येकाने सीमेवर जाऊनच देशसेवा केली पाहिजे, असे नाही. आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या सत्कृती, समाजोपयोगी कामे आणि देशाच्या सन्मानासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न यामधूनही आपण आपली देशभक्ती व्यक्त करू शकतो.

    याच भावनेतून तिरंगा ध्वज स्वच्छ, नीटनेटका आणि सन्मानाने फडकावा, म्हणून आम्ही हा छोटासा उपक्रम सुरू केला आहे. आम्ही मोफत इस्त्री करून देत आहोत, ही आमच्यासाठी केवळ सेवा नसून देशाच्या तिरंग्याप्रती आदर व्यक्त करण्याची एक छोटीशी संधी आहे.

    माझ्या मते, प्रत्येक नागरिकाने आपल्या परीने एखादी चांगली गोष्ट केली, समाजासाठी योगदान दिले आणि देशाचा सन्मान जपला, तर ती देखील खरी देशभक्तीच आहे.

    देशभक्ती मोठ्या गोष्टीतच असते असे नाही; ती आपल्या छोट्या-छोट्या सत्कृतीतूनही दिसून येते. 🇮🇳!”

    “२६ जानेवारी, १ मे व १५ ऑगस्ट 

    गणराज्य दिन, महाराष्ट्र दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आमच्या मानव लॉन्ड्री & ड्रायक्लिनर्स तर्फे लाखांदूर तालुक्यातील संपूर्ण शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि सहकारी संस्थांच्या तिरंगा ध्वजासाठी मोफत इस्त्रीची सेवा दिड दशकापासून आम्ही देत आहोत.

    तिरंगा हा आपल्या देशाचा अभिमान आणि राष्ट्रीय सन्मानाचे प्रतीक आहे. त्यामुळे गणराज्य दिन, महाराष्ट्र दिन व स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी तिरंगा स्वच्छ, नीटनेटका आणि दिमाखात फडकावा, या देशभक्तीच्या भावनेतून आम्ही हा छोटासा उपक्रम सुरू केला आहे.

    यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही.

    हा आमच्यासाठी व्यवसाय नाही, तर देशसेवेची एक छोटीशी संधी आहे. तिरंग्याचा मान राखूया आणि स्वातंत्र्याचा अभिमान जपूया. भारत माता की जय ! जय हिंद ! जय गोपाला!”

    Photo