ठळक बातम्या

    शिवसेना वणी विधानसभा जिल्हाप्रमुख आशिष भाऊ खुलसंगे यांच्यावर दुःखाचा डोंगर; वडील आंनदराव मारोती खुलसंगे यांचे निधन

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : शिवसेना वणी विधानसभा जिल्हाप्रमुख आशिष भाऊ खुलसगे यांचे वडील आंनदराव मारोती खुलसंगे यांचे मंगळवारी रात्री नागपूर येथील गेटवेल हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने उपचारादरम्यान रात्री १०.३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली असून खुलसगे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

    स्वर्गीय आंनदराव मारोती खुलसंगे यांच्या पार्थिवावर मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता नागपूर येथील सोनेगाव (एअरपोर्टजवळील) स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

    त्यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार व नागरिकांनी शोक व्यक्त करत दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

                  ॐ शांती.

    Photo