ठळक बातम्या

    दिला शब्द, केला पूर्ण! बाबापूर गावातील शुद्ध पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    बाबापूर : गावकऱ्यांनी मागील वर्षी जलशुद्धीकरण यंत्राची मागणी केली होती. गावकऱ्यांची ही मागणी लक्षात घेऊन आमदार संजय देरकर यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून बाबापूर येथे आर.ओ. जलशुद्धीकरण यंत्र उपलब्ध करून दिले. त्यामुळे गावातील शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.

    यापूर्वी गावकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी कायर येथून कॅन आणावे लागत होते. आर.ओ. यंत्र उपलब्ध झाल्याने ही गैरसोय दूर झाली असून गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

    गावकऱ्यांनी केलेली मागणी पूर्ण केल्याबद्दल आमदार संजय देरकर यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. “दिला शब्द केला पूर्ण” या भूमिकेतून स्थानिक विकासकामांना प्राधान्य देत नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

    यावेळी आर.ओ. जलशुद्धीकरण यंत्राचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. सरपंच भारती डाहुले, संपर्कप्रमुख अनिल आगळे, जिल्हाप्रमुख संजय निखाडे, सहसंपर्कप्रमुख संतोष माहूरे, महिला जिल्हाप्रमुख डिमताई टोंगे, किरणताई देरकर, गणपत लेडांगे, युवासेना जिल्हाप्रमुख समीर लेंगुळे, विधानसभा प्रमुख सुनील कातकडे, वणी तालुकाप्रमुख संतोष कुचनकर, मारेगाव तालुकाप्रमुख माजी सभापती अनिल राजुरकर, चिखलगाव सरपंच रुपालीताई कातकडे, उपजिल्हाप्रमुख कुंदन टोंगे, गौतम सुराणा, मधुकर लांडे, गीताताई उपरे, सुरेखाताई ढेंगळे, सविताताई आवारी, पुडलिक पिंपळशेंडे, बंडू पारखी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

    Photo