ठळक बातम्या

    कळंब तालुक्यात दुष्काळी पीक नुकसानीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे व मदतीची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     कळंब : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नर्सापूर येथे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, पीक नुकसानीची परिस्थिती आणि अपेक्षा जाणून घेतल्या.पाहणीदरम्यान महसूलमंत्र्यांनी शेतातील परिस्थितीची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून पीक नुकसानीचा आढावा घेतला. दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत शेतकऱ्यांना आवश्यक मदत व दिलासा मिळण्यासाठी पंचनामे तसेच पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

    यावेळी आदिवासी विकास मंत्री मा. अशोक उईके, खासदार संजय उत्तमराव देशमुख, आमदार सुमित वानखेडे, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चव्हाण, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रियाताई तोडसाम, भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश उपाध्यक्ष तथा पुसद जिल्हाध्यक्ष आरतीताई फुफाटे आणि भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष देवानंद पवार उपस्थित होते.

    तसेच जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, जिल्हा कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अभय देशपांडे, गटविकास अधिकारी अजय चव्हाण, तालुका कृषी अधिकारी सुहास बेंडे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

    पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. महसूलमंत्र्यांच्या सूचनेनंतर पंचनामे व आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

    Photo