विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
झरी : प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही अंगभूत गुण असतो संकोच्यामुळे त्याचा विकास न करता आपण त्यापासून हळूहळू दूर जातो परिश्रम सराव आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून अंगभूत कौशल्याचा विकास करा आणि उत्तम व्यक्तिमत्व घडवा असे मनोगत लोककलावंत डॉक्टर दिलीप अलोने यांनी व्यक्त केले
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रदर्शिक कला विभागाच्या वतीने या विभागाचे विद्यार्थी डॉक्टर दिलीप अलोने अभिनयाची वाटचाल या अंतर्गत मार्गदर्शन करीत होते
झरी येथील राजीव उच्च माध्यमिक शाळेत आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मोहन पडलवार होते तर प्रमुख अतिथी म्हणून विनोद सदलवार संजय भोयर व्यंकटेश द्यावर्तीवार आनंद निलावार अर्चना परचाके मारुती पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते
विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर अलोने यांनी पाठ्यपुस्तकातील लोकप्रिय गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेप घे रे पाखरा ही कविता सा अभिनय रसपूर्ण पद्धतीने सादर करून विद्यार्थ्यांची दाद घेतली यावेळी विद्यार्थ्यांना अभिनयाचे महत्त्व सांगून शरीर मन आवाजाच्या चढ उतारासाठी विविध कवायती सांगितल्या तसेच विविध विषयांवर विद्यार्थ्यांकडून अभिनय करून घेतला
प्रादेशिक कला विभागाचे संचालक डॉक्टर भोजराज चौधरी विभाग प्रमुख डॉक्टर मनोज उज्जैनकर प्राध्यापक डॉक्टर अमोल पाणबुडे यांच्या मार्गदर्शनात विविध शाळांमधून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे


