विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : नगरपरिषद वणीच्या बालकल्याण सभापती तथा प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका सौ. रिता ताई महेश पहापळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार व नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सामाजिक व नागरिकांच्या प्रश्नांप्रती सदैव तत्पर राहून प्रभागाच्या विकासासाठी तसेच महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रात त्यांनी कार्यरत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
सौ. रिता ताई महेश पहापळे यांना वाढदिवसानिमित्त निरोगी, आनंदी व यशस्वी आयुष्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छूक :
श्री. संजय चिंचोलकर
संपादक – विदर्भ वार्ता पोर्टल न्यूज, वणी

