ठळक बातम्या

    विधिमंडळ अंदाज समितीची आमदार संजय देरकर यांच्या निवासस्थानी भेट

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : यवतमाळ जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा सुरू आहे. समितीचे सदस्य वणी येथे दाखल झाल्यानंतर आमदार संजय देरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

    यावेळी आमदार संजय देरकर व त्यांच्या पत्नी किरणताई देरकर यांनी समितीचे स्वागत करून सदस्यांचा सत्कार केला. वणी विधानसभा क्षेत्रातील विविध प्रलंबित विकासकामे, नागरिकांच्या समस्या तसेच परिसरातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत आमदार संजय देरकर यांनी समितीसमोर निवेदन सादर करून त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली.

    यावेळी विधिमंडळ अंदाज समितीचे आमदार अर्जुन खोतकर, आमदार दिलीप बोरसे, आमदार काशीराम पावरा, आमदार कृष्णा खोपडे  यांची उपस्थिती होती.

    या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक गणपत लेडांगे, वणी शहर प्रमुख विनोद ढुमणे, शहर  संघटन मनीष बत्रा नगरसेवक सुधीर थेरे,नगरसेवक अजय धोबे, नगरसेवक अनिकेत बदखल, नगरसेवक गुलाम रंगरेज, जगणं जुनघरी, अभय मुथा, सुमेर खान, महिला तालुका प्रमुख सुरेखा ढेंगळे आदी उपस्थित होते.

    विधिमंडळ समितीच्या या दौऱ्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासविषयक प्रश्नांना शासनस्तरावर अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे.

    Photo