ठळक बातम्या

    .दि. वसंत को-ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंगची ६३ वी सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

     


    विदर्भवार्ता । प्रतिनिधी 

    वणी : दि. वसंत को-ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लि., वणी (रजि. क्र. १०६), तालुका वणी, जिल्हा यवतमाळची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर रोजी वसंत जिनिंगच्या सभागृहात उत्साहात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष प्रमोद नथूजी वासेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली.

    यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जयकुमार आबड, कार्यकारी संचालक शंकराव वऱ्हाटे, तसेच पुरुषोत्तम आवारी, संजय खाडे, अशोक धोबे, रविंद्र धानोरकर, प्रशांत गोहकार, ऍड. देविदास काळे, गजानन खापणे, घनश्याम पावडे, राजेंद्र कोरडे, अशोक नागभीडकर, विनोद गोडे, आशिष खुलसंगे, साधनाताई गोहकार, शारदाताई ठाकरे, प्रकाश मॅकलवार  भूमारेड्डी बाजलावार , व्यवस्थापक शालिक कोसारकर यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य व संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सभेच्या सुरुवातीला मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या संचालक मंडळातर्फे सादर करण्यात आलेला सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा व्यवहार अहवाल, जमाखर्च पत्रक, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद आदी कागदपत्रे सभेसमोर मांडण्यात आली. यावर चर्चा करून त्यास मंजुरी देण्यात आली. सभेमध्ये एकूण १३ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

    सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेला तोटा झाल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले. हा तोटा प्रामुख्याने संस्थेच्या मालमत्तेवरील घसाऱ्यामुळे झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, संस्थेच्या वर्किंगमध्ये ४९ लाख ३० हजार ४६ रुपयांचा नफा झाल्याचेही सभेत सांगण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद वासेकर यांनी संस्था ही कर्जमुक्त झाली असून लवकरच शिंदोला येथे शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी शेतकरी सुविधा केंद्र उभारणार असल्याचा मानस अध्यक्ष प्रमोद वासेकर व संचालक मंडळाने व्यक्त केला    यावर्षी रासायनिक खत विक्री मध्ये वसंत जिनींगचा  यवतमाळ जिल्ह्यात पहिला क्रमांक आला असून यासाठी विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नागपूर तर्फे अध्यक्ष प्रमोद वासेकर यांचा सत्कार करण्यात आला

    दरम्यान, संस्थेच्या वतीने वणी येथील शेतकरी मंदिर तसेच मारेगाव येथील शेतकरी सुविधा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या विवाह सोहळ्यांबाबतही माहिती देण्यात आली. या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देतानाच १० टक्के रक्कम धनादेशाद्वारे परत करण्यात आली

    संस्थेच्या कार्याचा आढावा, आर्थिक व्यवहार आणि आगामी कामकाजाबाबत सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. या ६३ व्या सर्वसाधारण सभेला संस्थेचे मोठ्या संख्येने सभासद उपस्थित राहिल्याने सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालिका साधनाताई गोहोकार यांनी केले.

    Photo