ठळक बातम्या

    *चैतन्य जेष्ठ नागरिक मंडळ गणेशपूर येथे आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिवसांच्या निमीत्ताने अति जेष्ठ नागरिकांचा सत्कार, कायदेविषयक व आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले*

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी/गणेशपूर : चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ गणेशपूर चे वतीने जेष्ठ नागरिक भवन छोरीया ले आऊट गणेशपूर येथे १ ऑक्टोबरला  आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिवस विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.

            कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.उदयराव गोहोकार होते प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.पांडुरंग व-हाटे,श्री.सुरेश मांडवकार,श्री.सुधाकरराव गारघाटे व डाॅ.कपिल उदयराव गोहोकार तर मार्गदर्शक म्हणून योगप्रशिक्षक डाॅ.गजानन अघळते, तालुका विधी सेवा समिती चे ॲड.दादा ठाकूर,ॲड.पूजा मत्ते उपस्थित होते..

    यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत विविध शाळांमध्ये उत्कृष्ट सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले अति जेष्ठ नागरिक श्री.मारोती सदाशिव मोहितकार व श्री.लक्ष्मण नारायण उलमाले यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

             तालुका विधी सेवा प्राधिकरण च्या वतीने ॲड.दादा ठाकूर यांनी जेष्ठ नागरिकांचे कल्याण व पालनपोषण अधिनियम २००७ च्या कायद्याची माहिती देऊन या कायद्यानुसार सर्व जेष्ठ नागरिकांना सन्मानाचे जीवन जगण्यासाठी पुर्ण संरक्षण आहे असून मोफत सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी तरतुदी आहेत असे सांगितले तर ॲड.पूजा मत्ते यांनी जेष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध कायद्यांच्या तरतुदी ची माहिती, मोबाईल वापरताना घ्यावयाची काळजी व जेष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

    डाॅ.कपिल गोहोकार यांनी जेष्ठ नागरिकांना दीर्घायुषी होण्यासाठी पाण्याची गरज पूर्ण करणे,डी जीवनसत्त्व, कॅल्शियम व पायाचे स्नायू मजबूत ई.आरोग्यविषयक बाबीचे मार्गदर्शन केले तर डाॅ.गजानन अघळते यांनी जेष्ठ नागरिकांसाठी आनंदाची गुरुकिल्ली अंतर्गत आपल्या मनाची व शरीराची मशागत करावी,मी कोण आहे व माझे कर्तव्य यांचा शोध घ्यावा, आनंद बाहेर कुठेही आपल्या जवळच असून ती शोधण्याची द्रुष्टी हवी, वर्तमानकाळात राहावे, अहंकार टाळून सकारात्मक विचारसरणी अवलंब करावा व अष्टांग योगातील यम,नियमाचे पालन करून नियमितपणे प्राणायाम व ध्यान करावेत इ.बाबत मार्गदर्शन केले.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.रामदास बोढे यांनी, संचलन श्री.नानाजी विधाते यांनी करून आभारप्रदर्शन श्री.लक्ष्मण इद्दे यांनी केले.

    या कार्यक्रमाचा लाभ अनेक जेष्ठ नागरिकांनी घेतला.

    Photo