ठळक बातम्या

    पांढरकवडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक

    पांढरकवडा : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांढरकवडा नगरपरिषद प्रशासन व निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली होत असलेल्या या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर २०२५ पासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून २४ तास उपलब्ध राहणार आहे.

    निवडणूक अधिकारी अमित रंजन, सहाय्यक निवडणूक अधिकारी शशिकांत बाबर, तसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या उपस्थितीत काल रविवारी नगरपरिषद  जिद्देवार सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी निवडणुकीचे सर्व टप्पे, तारीखा आणि नियमावली याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

    Photo