ठळक बातम्या

    वाघाचा म्हशीवर हल्ला, एक म्हस ठार एक जखमी रासा शेतशीवारातील घटना

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : वाघाने हल्ला चढवून एका म्हशीला ठार केले असून एक म्हस जखमी केल्याची घटना वणी तालुक्यांतील रासा शेतशीवारात १८ डिसेंबर गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

    अमोल पंढरी वरारकर रा. रासा असे शेतऱ्याचे नाव असून त्यांच्याकडे दोन दुधाळू म्हशी आहे. गुरुवारी त्यांनी दोन म्हशी गावालगत गोडगाव साखरा रोडवर शेतात सकाळी सात ते आठ वाजता दरम्यान

     चरायला घेऊन गेले तेव्हा ते दोन्ही म्हशीला शेतात सोडून घराकडे वापस आले. मात्र त्यानंतर एका तासाने दोन म्हशी पैकी एक म्हस हि जखमी अवस्थेत घराकडे वापस आल्याने त्या शेतकऱ्याला संशय आला की वाघाने आपल्या जनावरांवर हल्ला चढवून जखमी केले असावे. मात्र दोन म्हशी पैकी एक म्हस घरी वापस आल्याने दुसरी म्हस तर ठार केली नाही ना? अशी शंका व्यक्त करत त्यांनी शेताकडे धाव घेतली तेव्हा त्यांना एक म्हस जखमी अवस्थेत दिसून आल्याने जवळ जाऊन पाहिले असता गळ्याला जखमा आढळल्याने हा हल्ला वाघाने केला असावा अशी खात्री पटल्यावर त्यांनी याची रितसर तक्रार वनविभागाकडे केली आहे. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा जखमी म्हशीची पाहणी केली मात्र दुसरी म्हस दिसून आली नाही. मात्र काही वेळाने दुसरी म्हस ठार झालेल्या अवस्थेत मिळून आली. याची माहिती वनविभागाला दिली आहे मात्र सायंकाळपर्यंत वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसून वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या त्या म्हशीच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला नाही अशी माहिती सदर शेतकऱ्यांनी दिली.

    Photo