विदर्भ वार्ता |प्रतिनिधी
वणी : वणी नगर परिषद निवडणूकीत प्रभाग क्रमांक १४ (क) प्रलंबित राहिल्यानंतर आता या एकमेव जागेसाठी येत्या २० डिसेंबर ला मतदान होणार आहे.
या प्रभागात शिवसेना (शिंदे) , भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तीन राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरविले आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार नसल्याने त्यांचा कोणत्या उमेदवाराला पाठिंबा राहील याकडे लक्ष लागले आहे. मात्र शिवसेनेच्या उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू असून प्रचारात आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया यांनी हिना शकील अहेमद यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना नेते, कार्यकर्ते, सहकारी यांनी हिना अहेमद यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली असून प्रचारात झोकून दिले असल्याचे दिसून येत आहे.
*२० डिसेंबर ला मतदान, २१ डिसेंबर ला मतमोजणी*
वणी नगर परिषदेची निवडणूक पार पडली असून १४ प्रभागासाठी २ डिसेंबर ला मतदान झाले. ३ डिसेंबर ला मतमोजणी होणार होती मात्र प्रभाग क्रमांक १४ मधिल १४ (क) ची एक जागा प्रलंबित राहिल्याने त्या एका जागेसाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे तर सर्व १४ प्रभागासाठी २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.


