विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : बांग्लादेशात हिंदू अल्पसंख्यांक वर होत असलेली हिंसा, हत्या आणि तेथील प्रशासनाची निष्क्रियता विरोधात प्रदर्शन केले जात आहे.
शनिवारी २७ डिसेंबर ला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतीय जनता पार्टी, आर एस एस, बजरंग दल व हिंदूत्व वादी संघटनेच्या वतीने बांग्लादेश विरोधात आंदोलन करुन आक्रोश व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी बांग्लादेशात हिंदू वर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मी जरी एका राष्ट्रीय पक्षाचा माजी आमदार असलो तरी माझ्या रक्ता रक्तात हिंदूत्व भिनल आहे; जोपर्यंत हिंदू बांधव एकत्र येणार नाही तोपर्यंत बांग्लादेश सारखे अत्याचार थांबणार नाही; राजकारणाचे चपला जोडे बाहेर ठेवून एक हिंदू म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आहे ; हिंदू सुरक्षित आहे. मात्र दुर्दैवाने पाकिस्तान, बांग्लादेशात हिंदू मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आपली जबाबदारी आहे असे आवाहन करत त्यांनी बांग्लादेशाचा निषेध केला. यावेळी उपस्थितांनी जय जय श्रीराम; वंदे मातरम्, नारेबाजी करून आक्रोश व्यक्त केला. तसेच हिंदू वरील अत्याचार थांबविण्यात आले नाही तर मोठे आंदोलन केले जाईल असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, कल्याण पांडे, प्रशांत भालेराव, ऍड. प्रशांत पाठक, अनुराग काठेड, निलेश कटारीया, नितीन वासेकर, तुकाराम माथनकर, लक्ष्मण उरकुडे, अंकुश बोढे, लहुजी खामनकर, लोभेश्वर टोंगे, अजिंक्य शेंडे, संतोष लक्शेट्टीवार व हिंदूनिष्ट संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


