विदर्भ वार्ता |प्रतिनिधी
वणी : नगरपरिषद निवडणूक २०२५ चा बहुप्रतिक्षित निकाल आज दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर झाला. या निकालात प्रभाग क्रमांक २ मधून अपक्ष उमेदवार राजु भाऊ भोंगळे यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत दणदणीत विजय मिळवला आहे.
सुरुवातीपासूनच मतदारांचा विश्वास, प्रभागाच्या विकासासाठी असलेली स्पष्ट भूमिका आणि सातत्याने केलेला जनसंपर्क याचा कौल मतपेटीत उमटला. “काम बोलेल, राजकारण नाही” या भूमिकेवर ठाम राहून राजु भाऊ भोंगळे यांनी सामान्य नागरिकांचे प्रश्न, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व रस्ते विकास यांसाठी केलेली तळमळीची लढाई मतदारांना भावली.
विजयाची घोषणा होताच प्रभाग क्रमांक २ मध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्ते व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला. प्रभागातील सर्व मतदारांकडून राजु भाऊ भोंगळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, “हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे” अशी भावना व्यक्त होत आहे.
या दणदणीत विजयामुळे प्रभाग क्रमांक २ च्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
राजु भाऊ भोंगळे यांना प्रभाग २ मधील सर्व मतदारांकडून मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

