ठळक बातम्या

    माजी आमदार संजय रेड्डी बोदकुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली वणी नगर परिषदेवर भाजपाची एकहाती सत्ता नगराध्यक्षपदी भाजपच्या विद्या खेमराज आत्राम विजयी तर १८ नगरसेवक विजय.

     

    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी :वणी नगरपरिषद निवडणुकीचे निकाल दिनांक २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले. रविवारी सकाळी १० वाजता वणी येथील महसूल भवन येथे मतमोजणीला सुरुवात झाली.

    वणी शहरात केलेल्या विकासाचा विजय आहे. 

    भारतीय जनता पार्टीने वणी नगरपरिषदेवर एकहाती सत्ता काबीज केली असून नगराध्यक्षसह तब्बल १८ उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहे. शिवसेना उबाठा गटाचे ६ उमेदवार निवडून आले. काँग्रेस ३ तर दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहे.

     या निवडणुकीत स्वतंत्र लढत असलेले शिवसेना शिंदे गटाला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही.

     पहिल्या फेरीत प्रभाग १ ते ३ या प्रभागाची मतमोजणी झाली. यात प्रभाग क्रमांक १ ब ची निवडणूक रंगतदार झाली. शिवसेना उबाठाचे अजय धोबे यांनी अवघ्या ११ मतांनी विजय मिळवला. तर प्रभाग २ ब मध्ये अपक्ष उमेदवार राजू भोंगळे यांनी बाजी मारली.

    पहिल्या फेरी अखेर भाजपने आघाडी घेतली. भाजपने ६ पैकी ३ जागेवर विजय मिळवला तर दोन जागांवर शिवसेना उबाठाने बाजी मारली आहे. तर एक जागा अपक्षाकडे गेली आहे. दुस-या फेरीत प्रभाग ४ ते ६ या प्रभागाची मतमोजणी झाली. यात पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली. भाजपच्या प्रभाग क्रमांक ४ व ५ मधल्या चारही जागा निवडून आल्या आहे. तर प्रभाग क्रमांक ६ मध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली. प्रभाग ६ अ मध्ये काँग्रेसने विजय मिळवत खाते उघडले आहे. तर ६ ब मध्ये शिवसेना उबाठा विजयी झाली आहे. विशेष म्हणजे ६ ब ची निवडणूक खूपच चुरशीची ठरली. अवघ्या ६ मतांनी अनिल बदखल यांनी भाजपचे उमेदवार विलास डवरे यांचा पराभव केला. तर प्रभाग ५ अ मध्ये भाजपच्या सोनाली निमकर यांनी १ हजार पेक्षा अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला. तिस-या फेरीत प्रभाग ७ ते ९ या प्रभागाची मतमोजणी झाली. यात भाजपने त्यांचा आधीचा ग्राफ या फेरीतही पुढे सुरु ठेवला आहे. या तिन्ही प्रभागात भाजपला ३ तर उबाठा २ तर एका अपक्षाला विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार अ. हफिज सत्तार उर्फ टापू यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून दणदणीत विजय मिळवला आहे. तिस-या फेरी अखेर भाजपने १८ पैकी १० जागेवर बाजी मारली आहे तर महाविकास आघाडीने ६ जागांवर विजय मिळवला आहे. यात ५ जागांवर शिवसेना उबाठाने तर एका जागेवर काँग्रेस विजयी झाली आहे. तर २ जागा अपक्षाकडे गेल्या आहेत. चौथ्या फेरीत प्रभाग १० ते १२ या प्रभागाची मतमोजणी झाली. यात भाजपने विरोधी पक्षाचा सुफडा साफ करीत सर्वच्या सर्व ६ जागांवर विजय मिळवला. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १० न ११ चे भाजपचे विजयी उमेदवारांनी जवळ दुपट्ट मतांनी विजयी झाले आहेत. कोणताही विरोधक त्यांच्या समोर टिकला नाही. पाचव्या फेरीत प्रभाग क्र १३ व १४ ची मतमोजणी झाली यात प्रभाग १३ मध्ये काँग्रेसचे दोन्ही उमेदवारांनी विजय मिळवीला तर प्रभाग १४ मध्ये भाजपाचा । उमेदवार विजय झाला तर शिवसेना उबाठाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. सावे फेरीत प्रभाग क्रमांक १४ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ अर्चना शंकर झिलपे या निवडून आल्या आहेत.

    Photo