विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी प्रभाग क्रमांक १०/११, टागोर चौक, वणी येथे नगरपरिषदेच्या ट्यूबवेल कामाचा शुभारंभ माजी आमदार संजय रेड्डी बोदकुलवार यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. नगरपरिषद निवडणुकीनंतरचे हे पहिलेच भूमिपूजन व पहिले विकासकाम सुरू होत असल्याने हा क्षण नागरिकांसाठी अभिमानास्पद ठरला आहे.
या शुभारंभप्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्याताई आत्राम, भाजपा शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, प्रभाग क्रमांक १०/११ चे नगरसेवक लव्हलेश लाल, अनिल चिंडालीया, सौ, आरती वांढरे व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी ही विकास, पारदर्शकता आणि जनहितासाठी कटिबद्ध असून निवडणुकीदरम्यान दिलेल्या शब्दांना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा निर्धार या माध्यमातून दिसून येतो. पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि दर्जेदार विकासकामांना गती देण्याच्या दिशेने हे ट्यूबवेलचे काम महत्त्वाचे ठरणार आहे.
“ही केवळ सुरुवात आहे—वणीचा विकास हीच आमची ओळख!” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या दैनंदिन गरजांना प्राधान्य देत पुढील काळात आणखी विकासकामे हाती घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.




