ठळक बातम्या

    आज साने गुरुजींच्या जयंती निमित्त नगर वाचनालयाच्या प्रांगणात साने गुरुजींची जयंती साजरी करण्यात आली.

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : या प्रसंगी नगर वाचनालयाचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार व नवनिर्वाचित अध्यक्ष विद्याताई खेमराज आत्राम यांच्या हस्ते हरार्पन करण्यात आले. याप्रसंगी वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी साने गुरुजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. 

       या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाचे सचिव अभिजित अणे यांनी केले. आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक हरिहर भागवत यांनी केले. 

    या प्रसंगी वाचनालयाचे उपाध्यक्ष विशाल झाडे, सचिन आत्राम, विदर्भ साहित्य संघाचे अशोक सोनटक्के, गजानन भगत, वैजनाथ खडसे, देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार प्रामुख्याने उपस्थित होते.

    Photo