विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : वणी नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली. १४ प्रभागात एकूण २९ पैकी नगराध्यक्ष पदासह १८ नगरसेवक भाजपचे निवडून आले आहे. तर शिवसेना उबाठा गटाचे ६, कॉंग्रेसचे ३ अपक्ष २ तर शिवसेना शिंदे गटाला यश मिळाले नाही. तरी शिवसेना शिंदे गटाचे ॲड. कुणाल चोरडिया यांनी जनतेने दिलेला कौल मान्य केला.
त्यांनी म्हटले की लोकशाहीत विजय–पराजय हे अपरिहार्य असतात. शिवसेना (शिंदे गट)ने ही नगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीने, प्रामाणिकपणे व लोकांच्या प्रश्नांना अग्रक्रम देत लढवली.
महत्त्वाची बाब म्हणजे, या निवडणुकीपूर्वी शिवसेना (शिंदे गट) ची संघटनात्मक स्थिती दीर्घकाळ निष्क्रिय अवस्थेत होती आणि पक्षाला नवसंजीवनी देण्याची नितांत गरज होती.
अशा परिस्थितीत अवघ्या एका महिन्याच्या अल्प कालावधीत जिल्हा संघटक श्री. विजय चोरडिया यांनी पक्ष संघटन उभे करून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
याच काळात पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व आधारस्तंभ *माजी आमदार तथा चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा समन्वयक श्री. विश्वासभाऊ नांदेकर* यांचे नुकतेच दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. अशा भावनिकदृष्ट्या कठीण परिस्थितीत संघटनात्मक जबाबदारी सांभाळून निवडणूक लढवणे हे अत्यंत आव्हानात्मक कार्य होते. तरीही संयम, जबाबदारी आणि निष्ठेने ही जबाबदारी पार पाडण्यात आली.
एका निवडणुकीच्या निकालावरून कोणत्याही पक्षाचे किंवा नेतृत्वाचे भवितव्य ठरवणे योग्य नाही. हा निकाल आम्ही पराभव म्हणून नव्हे, तर पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेतील पहिली कसोटी म्हणून पाहत आहोत.
या निवडणुकीत आम्हाला मिळालेला जनसमर्थनाचा प्रतिसाद हा भविष्यासाठी अत्यंत आशादायक असून, येणाऱ्या काळात अधिक सक्षम, संघटित आणि प्रभावी स्वरूपात शिवसेना (शिंदे गट) जनतेसमोर उभी राहील असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते ॲड. कुणाल चोरडिया यांनी व्यक्त केला.
त्यांनी या प्रचारादरम्यान आम्हाला दिलेल्या प्रेम, विश्वास व सक्रिय पाठिंब्यासाठी सर्व मतदार, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार मानले आणि ही फक्त सुरुवात असून, आगामी काळात अधिक सकारात्मक आणि प्रेरणादायी निकाल नक्कीच दिसून येतील, याची आम्ही खात्री देतो असे आश्वासन दिले.
टीका करणे सोपे असते; मात्र कठीण काळातही संयम, जबाबदारी आणि सकारात्मक दृष्टिकोन राखणे हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे.
अॅड. कुणाल विजय चोरडिया
शिवसेना (शिंदे) गट
