ठळक बातम्या

    श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालीत सर्व शाळांचे संयुक्तरित्या गणराज्य दिन उत्साहात संपन्न

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : येथील श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालीत वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा साजरा करण्यात आला.

    यावेळी संस्थेचे सचिव मा.श्री. ओमप्रकाशजी चचडा यांच्या अध्यक्षतेखाली वणी पब्लिक अँड जूनियर कॉलेजचे प्र.प्राचार्य श्री.सतिश बाविस्कर,राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयचे मुख्याध्यापक श्री.अभय पारखी, छत्रपती श्री शाहू महाराज प्रायव्हेट इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्युटचे प्राचार्य श्री. सिद्धांत तेलतुंबडे उपस्थित होते.श्री.अभय पारखी यांनी ध्वजारोहण केले. कार्यक्रमात विद्यार्थांनी नृत्ये, लेझीम, एरोबिक, फॅन्ड्रील, भाषणे, कवायती इत्यादी उपक्रमे सादर केली. संस्थेचे सचिव श्री. ओमप्रकाशजी चचडा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नागरिकांनी आपल्या अधिकाराबरोबर कर्तव्याची सुद्धा जाणीव ठेवावी असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी संचालन योगेश सर व अंजली पाझारे यांनी तर प्रगती वऱ्हाटे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.

    *********************************************



    Photo