ठळक बातम्या

    आंतरशालेय नृत्यस्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना तृतीय पारितोषिक मिळाले

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : येथील श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थाद्वारा संचालीत वणी पब्लिक स्कूल व ज्यु.कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी प्रेस वेल्फेअर असोसिएशन वणी तर्फे आयोजित आंतरशालेय नृत्य स्पर्धेत माध्यमिक गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ही स्पर्धा एस.पी.एम. शाळेच्या रंगमंचावर आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव मा. ओमप्रकाशजी चचडा, सदस्य श्री.विक्रांतजी चचडा शाळेचे प्र. प्राचार्य श्री.सतीश बाविस्कर तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये सौ.शुभांगी बल्की, सौ. प्रणोती खडसे, पूर्वी बरडे, सौ.वंदना बाविस्कर इत्यादी शिक्षकांचा व विद्यार्थ्यांच्या पालकांचा मोलाचा वाटा आहे.

    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


    Photo